महाविद्यालयात मराठी विभाग महाविद्यालय स्थापनेपासून(1960) सुरू आहे. 1972 पासून पद्व्युत्तर विभाग अनुदानित स्तरावर सुरू आहे. पदवी व पद्व्युत्तर विद्यापीठ परीक्षेत 20 विद्याथ्र्यांनी सुवर्णपदके व इतर पारितोषिके प्राप्त केलेली आहेत. 2010 साली या विभागातील विद्यार्थिनी महाराष्ट्रात प्रथम आलेली  आहे. या विभागातून 52 विद्यार्थी नेटसेट परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत.
विभागात 2008 पासून एम फिल व 2010 पासून पीएच डी संशोधन केंद्र सुरू आहे.  या केंद्रांतर्गत 93 विद्याथ्र्यांनी एम फिल तर 20 विद्याथ्र्यांनी पीएच डी पदवी प्राप्त केलेली आहे.
विभागास प्राचार्य एस.के.उनउने प्रा.डॉ.वा.पू.गिंडे डॉ.ल.रा.नसिराबादकर, डॉ. द.ता.भोसले, र.बा.मंचरकर अशा व्यासंगी प्रााध्यापकांची व समीक्षकांची परंपरा लाभलेली आहे.